Tue, Sep 29, 2020 09:10होमपेज › Kolhapur › विद्यापीठात पत्रकारिता अध्यासनाच्या ऑनलाईन जर्नालिझम कोर्सला प्रवेश सुरू

विद्यापीठात पत्रकारिता अध्यासनाच्या ऑनलाईन जर्नालिझम कोर्सला प्रवेश सुरू

Last Updated: Aug 05 2020 6:01PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. १० ऑगस्टपर्यंत विद्यार्थी या अभ्यासक्रमाला ऑनलाईन प्रवेश घेऊ शकतात.

अधिक वाचा : कोल्हापूर : नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे, जिल्हाधिका-यांचे आवाहन

कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. वयाची कोणतीही अट नाही. हा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे. पत्रकारितेत पारंपरिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांना अलिकडे खूप महत्त्व आलेले आहे. नवमाध्यमांचे तंत्र अवगत असणार्‍यांना नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध आहेत. 

अधिक वाचा : बाजार समितीवर प्रदीप मालगावे यांची प्रशासक म्हणून निवड

या दृष्टीकोनातून हा पदविका अभ्यासक्रम राबविला जात आहे. सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, मोबाईल पत्रकारिता, ऑनलाईन एडिटिंग, डॉक्युमेंट्री, ऑडिओ-व्हिडिओ पत्रकारिता, कायदे आणि आचारसंहिता, डेटा पत्रकारिता यासह अन्य विषय या अभ्यासक्रमात शिकविले जातात. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी या अभ्यासक्रमाचे वर्ग भरतात. या अभ्यासक्रमासाठी वार्षिक १०, ५०० रूपये शुल्क आहे. अधिक माहितीसाठी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव (मोबा. ९८८११९१२२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा : कोल्‍हापूर : बाचणी-नांदगाव बंधारा पाण्याखाली 

 "