Mon, Sep 28, 2020 07:47होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात 668 नवे कोरोनाबाधित

कोल्हापूर जिल्ह्यात 668 नवे कोरोनाबाधित

Last Updated: Aug 09 2020 1:16AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत 668 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा 269 वर गेला आहे. शहरातील रुग्णसंख्या 312 ने वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण 10 हजार 659 पॉझिटिव्हपैकी 4 हजार 121 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 5 हजार 609 इतकी आहे.

कोल्हापूर शहरात एका दिवसात   312 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 2 हजार 913 झाली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 हजार 586 अहवालांपैकी 2 हजार 483 निगेटिव्ह, तर 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 54 अहवाल प्रलंबित आहेत. अँटिजेन टेस्टिंग चाचणीचे 595 अहवाल आले असून, त्यामध्ये 99 पॉझिटिव्ह, तर 496 निगेटिव्ह आले आहेत. खासगी रुग्णालये व लॅबमध्ये 866 पॉझिटिव्ह, तर 18 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आरटी-पीसीआरला पाठविण्यात आलेल्यांपैकी 1 हजार 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आलेल्या  अहवालांमध्ये तालुकानिहाय रुग्णांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. 
आजरा-11, भुदरगड-8, चंदगड-9, गडहिंग्लज-21, गगनबावडा-1, हातकणंगले-153, कागल-41, करवीर-106, पन्हाळा- 35, राधानगरी-12, शाहूवाडी-12, शिरोळ-50, नगरपरिषद क्षेत्रातील  230 जणांचा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या : आजरा-200, भुदरगड-253, चंदगड-414, गडहिंग्लज-305, गगनबावडा-30, हातकणंगले-961, कागल-199, करवीर-1068, पन्हाळा-371, राधानगरी-312, शाहूवाडी-336, शिरोळ-395, नगरपरिषद क्षेत्र-2,083, कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील 2,913, इतर जिल्हा व राज्यातील 151.

 "