Sat, Aug 15, 2020 16:49होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातील उद्रेक थांबेना; आज दिवसभरात ४६ जणांची भर

कोल्हापुरातील उद्रेक थांबेना; आज दिवसभरात ४६ जणांची भर

Last Updated: Jul 16 2020 6:39PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. बुधवारी विक्रमी 155 बाधित आढळून आल्यानंतर आज गुरुवारीही नव्याने 46 रुग्णांची भर पडली. सायंकाळी 6 पर्यंतची आकडेवारी आहे. आज जयसिंगपूर येथील वृध्द महिला आणि मजरेवाडी येथील एक वृध्द अशा दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

मजरेवाडीच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या जयसिंगपूरच्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही नवीन ३ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हातील हुपरी येथील बिरदेव मंदिर परिसरात रुग्ण आढळला आहे. तो एक पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. तर शहरातील कसबा बावडा येथे पोस्ट ऑफिस जवळील छत्रपती कॉलनीत एक रुग्ण आढळला आहे.

जिल्ह्यात बुधवारी नवे 155 कोरोना रुग्ण आढळून आले. एकाच दिवशी शंभरावर रुग्णवाढीची  पहिलीच वेळ ठरली. कोल्हापूर शहरात सर्वाधिक 49 रुग्ण आढळले. इचलकरंजीत 29, तर शहरालगतच्या गांधीनगर परिसरात आणखी 21, चंदगडमध्ये 20 कोरोनाग्रस्त आढळून आले. आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील टिंबर मार्केट, वारे वसाहत हॉटस्पॉट होत चालले आहेत. या परिसरासह गांधीनगर आणि इचलकरंजीतील रिस्क वाढत चालली आहे.