Wed, May 19, 2021 05:18
पुन्हा मृत्यूचा उच्चांक, कोल्हापूर जिल्ह्यात ४४ रुग्ण दगावले

Last Updated: May 05 2021 2:10AM

कोल्हापूर ः जिल्ह्यातील कोरोना संसर्गासह मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे उच्चांकी 44 रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवे 984 रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात 740 जणांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सक्रिय रुग्णसंख्या 9 हजार 792 वर पोहोचली आहे. शहरात 219 नव्या रुग्णांची भर पडली, तर 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांत 18 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नातेवाईकदेखील भयभीत झाले आहेत. कोरोना संसर्गापासून नागरिकांनी आता खबरदारीच घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या 24 तासांत आजरा-74, भुदरगड-22, चंदगड-36, गडहिंग्लज-76, गगनबावडा-4, हातकणंगले-145, कागल-64, करवीर-94, राधानगरी-4, पन्हाळा-44, शाहूवाडी-70, शिरोळ  तालुका-29, नगरपालिका-49, तर महापालिका कार्यक्षेत्रात-219 बाधित रुग्ण सापडले आहेत. 

मृतांत करवीर-5, हातकणंगले-10, पन्हाळा-2, गडहिंग्लज-4, चंदगड-1, शाहूवाडी तालुक्यातील-1, उर्वरित 21 अन्य जिल्ह्यांतील आहेत. मंगळवारी शासकीय प्रयोगशाळेत तपासलेल्या 1 हजार 879 स्वॅबपैकी 1 हजार 320 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर 485 जण बाधित आले. यामध्ये 73 जणांचे स्वॅब रिपिट आहेत. अँटिजेनवर तपासलेल्या 1 हजार 641 पैकी 1 हजार 295 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर 346 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या 467 पैकी 314 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले असून, 153 जणांना बाधा झाली आहे. दिवसभरात 2 हजार 2 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. तर 4 हजार 248 जणांचे स्वॅब घेतले आहेत.