Sun, Sep 20, 2020 09:30होमपेज › Jalna › जालन्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर 

जालन्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर 

Last Updated: May 26 2020 8:53AM
जालना : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जालना जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी जिल्हयात आणखी दोन नवीन रूग्णांची वाढ झाल्याने  जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण  संख्या ७६ वर पोहचली  आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सापडलेल्या नवीन दोन रुग्णांमध्ये हिवरा काबली (ता.जाफराबाद) आणि वखारी वडगाव (ता.जालना )येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. शहरातील जवळपास चार खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आजपर्यंत क्वॉरंटाईन व्हावे लागल्याने आरोग्य यंत्रणा अडचणीत सापडली आहे.
 

 "