Tue, Aug 04, 2020 11:41होमपेज › Jalna › जालना : समाधानकारक पावसाने पेरणीचे कामे सुरू 

जालना : समाधानकारक पावसाने पेरणीचे कामे सुरू 

Last Updated: Jun 17 2020 1:01PM

संग्रहित छायाचित्रजालना :  पुढारी वृत्तसेवा

भोकरदन तालुक्यातील समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरणीची धावपळ सुरू झाली आहे. परिसरात मागच्या आठवड्यात सायंकाळी मेघ गर्जनेसह पावसाने समाधानकारक हजेरी लावली. या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पाऊस पडल्याने शेतकरी शेतात सरी, फुली काडून कापसाची लागवड, सोयाबीन, मक्का, मुग, तूर आदींची पेरणी करताना दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी हंगामापूर्व शेती मशागतीची कामे शिल्लक असून जास्तीचे मजूर लावून खरिपाची पेरणी वेळेवर करण्याची घाई करताना दिसत आहे.

वाचा :  अन् शेतक-याने मुलांनाच औताला जुंपले! (video)

शेतमालाला योग्य भाव मिळण्याची कायम प्रतीक्षा करीत असलेल्या बळीराजाला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यत शेताच्या बांधवर घालवावा लागत आहे. शेतीची नांगरणी करणे, शेतातील केरकचरा वेचने, बांधावरील तण नाहीसा करणे, शेण खत टाकणे आदी कामे अवघ्या एका महिन्यात आटोपणे गरजेचे असते. पारंपरिक साधनासह आता शेतीकरिता यंत्र सामग्रीचा वापर केला जातो. यामुळे श्रमाची बचत होत असली तरीही लागवडीच्या खर्चात मात्र वाढ होत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. नापिकी, अतिवृष्टी असली तरी आणि कर्जबाजारी झाले तरी शेती करण्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाही. येणारा दिवस हा शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येतील, अशी आशा ठेवून शेतकरी खरीप हंगामाच्या कामात व्यग्र दिसत आहेत. शेती मशागतची कामे महिन्याभर पुर्वीच पूर्ण झाली होती. दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरात पेरणीचे कामे युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

ट्रॅक्टर आणि शेणखतासाठी भटकंती 

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, वखरणी, कलटीवटर, रूटर हे कामे ट्रॅकरच्या सहाय्याने करावे लागत आहे. शेतातील पीक सकस आणि भरघोस होण्यासाठी तसेच अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी शेतकरी खत देतो. शेतीची पोत कायम राखण्यासाठी शेणखताची गरज असते. तसेच जनावराची संख्या कमी होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेणखतासाठी भटकंती करावी लागत असून यात खर्च ही जास्त होत आहे.

वाचा :जालना : आन्वा परिसरात अतिवृष्टी
बळीराजाने शेतीची सर्व पूर्वतयारी केली असून पेरणीसाठी जोरदार कंबर कसली आहे. पेरणीच्या तयारीसाठी जमीन ओली होणे गरजेचे असते आणि या दोन दिवस पाऊस चांगला झाल्यामुळे पेरणीला चांगला वेग आला आहे. तसेच शेती पूर्व व शेतीच्या कामांसाठी लागणारे साहित्य विविध प्रकारची खते, बियाणे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी खत विक्री केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. पूर्वी बैलांच्या सहाय्याने मशागतीचे कामे केली जात होती. वरचेवर बैलांची संख्या कमी होऊ लागल्याने आता ट्रॅक्टरच्या सहाय्यनेच मशागतीची कामे केली जात आहेत. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे सध्या मशागतीच्या कामाचे पैसे भागवताना शेतकर्‍यांना उसनवारी करावी लागत आहे.

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या

 कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये उद्याची आवश्यकता काय हे बघून पिकाची पद्धत ठरवावी. खत व बियाणे घेण्यासाठी सोशल डिस्टंन्स ठेवावे, सोबतच आपली कौटुंबिक परिस्थिती, जमिनीची पत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार देखील यासाठी व्हावा, अशा सूचना कृषी सहाय्यक एन. के. पायघन यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी परवाना धारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या बियाण्याबाबत संपूर्ण तपशिल असलेले उदा. पीक वाण, लेबल, नंबर, परवाना तपासणीचा दिनांक, मुदत, बियाणे किंमत, खरेदीदारांचे उत्पादकाचे, विक्रेत्यांचे नाव तसेच विक्रेत्यांची सही, रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
वाचा : जालना : आईची दोन मुलांसह स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या