Mon, Apr 12, 2021 03:16
जालना : पिंपळगाव येथील घाणेवादी शिवारातील शेततळ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

Last Updated: Mar 29 2021 7:44PM

जालना : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील पिर पिंपळगाव येथील घाणेवादी शिवारातील शेततळ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. गजानन रामलाल जोरले (वय ३२ रा. कुंभार गल्ली पाणीवेस, जालना) व कैलास आसाराम खरात (वय ३० रा. सोनल नगर जुना जालना) असे मृत तरूणांची नावे आहेत. 

अधिक वाचा : सात वर्षांपासून कोटेशन भरूनही कनेक्शन नाही, पण शेतकऱ्याला तीन हजाराचे बिल धाडले!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीर पिंपळगाव येथील रवी प्रल्हाद कावळे यांच्या शेतातील शेततळ्यात हे दोघे मित्र पोहण्यासाठी गेले होते. या वेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पोहार यांनी तातडीने घटनास्थळ धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या तरुणांचे मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहेत.