Wed, May 19, 2021 05:07




जालना : 'हरवलेली माणसं' पुस्तकाच्या सन्मानार्थ लेखक दादासाहेब थेटे यांचा फोटो पोस्ट तिकिटावर 

Last Updated: Apr 19 2021 11:42AM





घनसावंगी (जालना) : पुढारी वृत्तसेवा 

अवघ्या दोन महिन्यांत पुस्तकाच्या तीन आवृत्या प्रकाशित झालेल्‍या 'हरवलेली माणसं' या पुस्तकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. नवी मुंबई येथील राज्य कर आयुक्त श्री. मेहबूब कासार यांनी या पुस्‍तकाचे लेखक व घनसावंगी तालुक्यातील दैठणा खुर्द गावचे भूमिपुत्र दादासाहेब थेटे यांच्या सामाजिक जाणिवांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादासाहेब थेटे यांचा फोटो असलेल्या भारतीय पोस्ट तिकिटाचे प्रकाशन केले. 

वाचा : 'पॉईंट मॅन' च्या सतर्कतेमुळे वाचले मुलाचे प्राण, वांगणी रेल्वे स्थानकातील घटना

या तिकिटांचा वापर करून नवी मुंबई राज्य कर आयुक्त मेहबूब कासार यांनी लेखक दादासाहेब थेटे यांना सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्र लिहले आहे. या पुस्तकामुळे होणाऱ्या सकारत्मक बदलाचे कौतुकही केले आहे.  या पत्रासोबत दादासाहेब थेटे यांचे फोटो असलेली आणखी आठ तिकिटे पाठवली असून या तिकिटांचा वापर देशी तसेच आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहार करण्यासाठी करावा, अशी विनंतीही केली आहे. 

वाचा :दिल्लीतील कोरोना परिस्थिती हाताबाहेर, मोठी मैदाने, मंदिर परिसर, रिकाम्या जागांवर कोव्हिड उपचार केंद्रे!

'हरवलेली माणस' या पुस्तकाला सामान्य वाचकांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी वर्गाकडून मिळत असलेली लोकप्रियता नक्कीच सामाजिक बदलास कारणीभूत ठरेल, असा विश्वास या पत्रातून आयुक्त मेहबूब कासार यांनी व्यक्त केला आहे. पोस्टाच्या तिकिटावर एका ग्रामीण भागातील लेखकाचा झालेला सन्मान पाहून त्यांचे व हरवलेली माणसं या पुस्तकाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.