Mon, Apr 12, 2021 03:02
मराठा आरक्षण : ६६ वर्षाच्या उपोषणकर्तीची प्रकृती खालावली

Last Updated: Mar 19 2021 6:55PM

वडीगोद्री (जि जालना) : पुढारी वृतसेवा 

साष्टपिंपळगाव येथील ६६ वर्षीय मराठा महिला उपोषणकर्तीची तब्येत खालावली असून या महिला उपोषणकर्तीवर अंबड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन दिवसांपासून १४ जण आमरण उपोषणाला बसले आहेत.

अधिक वाचा : जालना : भर दिवसा रस्ता अडवून २५ हजारांची रोकड लांबविली

साष्टपिंपळगाव येथील मराठा आंदोलकांना १६ तारखेला ताब्यात घेतल्यानंतर ठिय्या व साखळी उपोषण सुरू झाले. हे आंदोलन पुढे तीव्र होत गेले आणि पुन्हा १४ जण आमरण उपोषणाला बसले आहे. मराठा आरक्षण मिळावे यासाठी साष्टपिंपळगाव येथे मागील ६१ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून कधी आमरण उपोषण तर कधी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून १४ जणांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यातील उपोषणकर्त्या महिला कौशल्याबाई जाधव (वय ६६) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

अधिक वाचा : महावितरणने शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरचा वीज पुरवठा केला बंद; महापालिकाही देणार प्रत्युत्तर 

साष्टपिंपळगाव येथील मराठा आंदोलकांची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सर्व मराठा आंदोलक पुरुष व महिलांतून होत आहे.