Sat, Feb 27, 2021 06:57
जालना : नायब सुभेदार गणेश फदाट यांचे कर्तव्यावर असताना निधन

Last Updated: Jan 21 2021 7:13PM
जाफराबाद (जालना) : पुढारी वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याच्या बोरगाव फदाट येथील सैन्य दलात असलेल्या नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट (वय ४१) यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले आहे. कमांड हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज (ता.२१) सकाळी ९ वाजून १५ च्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. (Jalna district Nb subedar Ganesh Fadat dies due to heart attack)

अधिक वाचा : सीरमची आगीची धग दिल्लीत पोहोचली!

त्यांचे पार्थिव विमानाने रात्री औरंगाबाद येथे येणार असून (दि.२२) शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता बोरगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दुख:द घटनेमुळे बोरगावसह तालुक्यावर शोककला पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद गणेश फदाट यांचा लहान भाऊ दिनेश फदाट हा देखील सैन्य दलात कार्यरत आहे. 

अधिक वाचा : मुंबई विद्यापीठातील कुलसचिव नेमणुकीच्या वादात राज्य सरकारला दणका!

शहीद गणेश फदाट यांना देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यादलातील सेवा पूर्ण केल्यानंतरही परत सैन्य दलास विनंती करून सेवाकाळ वाढवून घेतला होता. अशातच नायब सुबेदार पदाची जबाबदारी सांभाळत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.