Tue, Aug 04, 2020 10:57होमपेज › Jalna › जालना : बदनापूर तहसील कार्यालयास आग 

जालना : बदनापूर तहसील कार्यालयास आग 

Last Updated: Jun 25 2020 11:14AM
जालना : पुढारी वृत्तसेवा  

बदनापूर तालुक्यात पहाटे 3 वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला आणि दुसरीकडे तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने पेट घेतल्याने या विभागातील निवडणूक अभिलेखे जळून खाक झाल्याची घटना पहाटे ४ वाजता घडली. कोषागार कार्यालयात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आल्याने तातडीने अग्निशामक दलास पाचारण करून आग विझविण्यात आली. या विभागात मागील १५ वर्षांचे निवडणूक रेकॉर्ड होते.

वाशिम : शेतातील झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून एकाची हत्त्या, तीन जखमी 

बदनापूर तहसील कार्यालयात असलेल्या निवडणूक विभाग खोलीतून अचानक धूर निघू लागल्याचे कोषागार कार्यालयात पोलिस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तातडीने तहसीलदार छाया पवार व अग्निशामक दलास माहिती दिली.

हिंगोली : नवे ८ रुग्ण वाढले

बदनापूर तहसील कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार संजय शिंदे, मंडळ अधिकारी पाउलबुद्धे, तलाठी सुनील होळकर यांनी तहसीलकडे धाव घेतली. दरम्यान ५ वाजता अग्निशामक दलाची तुकडी पोहोचली व आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. काही मिनिटात आग आटोक्यात आली. मात्र या विभागात असलेले मागील १५ वर्षाचे विधानसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकीचे कागदपत्रे जळून खाक झाले.

जालना : पाझर तलावात पाच मुली बुडाल्या