Wed, Aug 05, 2020 18:45होमपेज › Jalna › जालना : अपघातानंतर फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटले

जालना : अपघातानंतर फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटले

Last Updated: Jul 04 2020 10:24AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

जालना येथून देवळाई भागातील आपल्या घरी येणाऱ्या एयू फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास अपघातानंतर लुटण्यात आले. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल लंपास करण्यात आला आहे. बीड बायपास ते चिकलठाणा (जुना बायपास) रोडजवळ शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

वाचा  : कोल्हापुरात सात तर इचलकरंजीत 5 नवे रुग्ण

विनोद थोटे हे एयू फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. ते कामानिमित्त जालना येथे गेले होते. रात्री तेथून परतत असताना त्यांनी केम्ब्रिज चौकातून त्यांनी आपली चारचाकी बीड बायपास रोडने वळविली. ते चिकलठाणा गावात जाणाऱ्या रस्त्यापर्यंत आले असता पाठीमागून आलेल्या दुसऱ्या चारचाकीने त्यांना धडक दिली. यानंतर दोन्ही वाहने उभी करण्यात आली. त्या अनोळखी चारचाकीमध्ये पाचजण होते. त्यांनी विनोद थोटेसोबत हुज्जत घातली. तेथे बंदोबस्तासाठी पोलिस देखील होते. यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनांचे फोटो काढून घेतले. तेवढ्यात त्या पाच जणांपैकी काहींनी थोटे यांच्या गाडीत घुसून लॅपटॉप, मोबाईल, चार्जर आणि इतर साहित्य घेऊन आपल्या चारचाकीमधून (क्र. एमएच ४४, एस ४४८१) पोबारा केला. यानंतर विनोद थोटे यांनी बायपासने शिवाजीनगरपर्यंत त्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे वाहतूक जामचा फायदा घेऊन पसार झाले. 

वाचा  : तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यांसाठी वाहनखरेदी

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. उपनिरीक्षक इंगळे घटनास्थळी जावून पाहणी केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.