Sun, Sep 20, 2020 09:39होमपेज › International › मास्क वापरण्यासंबंधी 'डब्ल्यूएचओ'ची 'ही' आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे  

मास्क वापरण्यासंबंधी 'डब्ल्यूएचओ'ची 'ही' आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे  

Last Updated: Jun 06 2020 5:08PM

File Photoजिनिवा : पुढारी ऑनलाईन

जगात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने फेस मास्क वापरण्यासंबंधीचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालावे, असा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.

कोरोनामुळे जगातील मृतांचा आकडा ४ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेद्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सर्व उपलब्ध पुराव्यांचा काळजीपूर्वक आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि समाजातील गट यांच्याशी व्यापक स्वरुपात सल्लामसलत करून डब्ल्यूएचओने सुधारित मार्गदर्शन तत्त्वे तयार केली आहे.”

आता सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी कपड्याचे (फॅब्रिक) मास्क (नॉन-मेडिकल) परिधान केले पाहिजेत. फॅब्रिक मास्क कमीतकमी तीन थरांचे असावे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून येत असतील तर त्याने मेडिकल मास्क वापरावे. प्रवास करत असताना मास्कचा वापर करण्यासाठी सरकारने जनतेला प्रोत्साहन द्यावे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

भारतात ८ जून पासून मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळे खुली केली जात आहेत. त्यासाठी या ठिकाणी जाताना सर्वांना मास्कचा वापर सक्तीने करावा.
 

 "