इस्तंबुल : पुढारी ऑनलाईन
तुर्कीमधील एका धार्मिक पंथाच्या अदनान ओकतार नावाच्या नेत्याला न्यायालयाने दहा वेगवेगळ्या गुन्ह्यांबाबत 1,075 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. इस्तंबुल येथील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
२०१८ मध्ये देशभरात छापेमारी करून त्याच्या या पंथाला मानणार्या अनेकांना अटक करण्यात आली होती. हा माणूस महिलांना ‘मांजरी’ म्हणत असे आणि अनेक टी.व्ही. शोमध्ये सूटबूट घालून अनेक तरुणींशी नृत्यही करीत असे. आपले सुमारे एक हजार महिलांशी संबंध असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले होते.
अदनान ओकतार याच्यावर लैंगिक शोषण, फसवणूक आणि राजकीय व लष्करी हेरगिरी अशा प्रकारचे अनेक आरोप होते.