Mon, Nov 30, 2020 12:38होमपेज › International › 'या' सुरक्षा रक्षकाने स्वत: पावसात भिजत श्वानावर धरले छत्र

'या' सुरक्षा रक्षकाने स्वत: पावसात भिजत श्वानावर धरले छत्र

Last Updated: Jul 02 2020 12:14PM
स्कॉटलॅड (मॉरिसन) : पुढारी ऑनलाईन

अचानक पाऊस आला म्हटलं की लोक स्वत: च्या संरक्षणासाठी धावपळ करत असतात. यावेळी लोक बसस्थानक, दुकान, पूल किंवा कोणतेही एखाद्या झाडाचाही आधार घेतात. पण ज्यांच्याकडे रेनकोट किंवा छत्री असते त्यांना या आसऱ्याची गरज नसते. अशाच जोरदार पावसात एका सुरक्षा रक्षकाने चक्क स्वत: पावसात भिजत एका श्वानाच्या अंगावर छत्री धरली आहे. त्यांने या श्वानाचे पावसापासून संरक्षण केले आहे. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.  

हा फोटो MelGracie_ (मेलग्रेसी) या एका युजर्सने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन ही लिहिली आहे की, 'या मॉरिसन सुरक्षा रक्षकाला प्रोत्साहन करा, ज्याने या श्वानाचे पावसापासून संरक्षण केले. ते पुढे म्हणतात की, पावसाविषयी श्वानांना कसे वाटते हे आपणास कधीच कळत नाही.' यानंतर या फोटोला काही तासांतच २ लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स तर २० हजारांहून अधिक लोकांनी रिट्वीट केले आहे. 

वाचा : मेक्सिकोत व्यसनमुक्ती केंद्रावर हल्ला; २४ ठार

या घटनेनंतर श्वानाचे मालक David Cherry (डेव्हिड चेरी) यांनीही सुरक्षा रक्षकाचे आभार मानले आहेत. त्यांनी एक ट्‌विट करत लिहिले आहे की, 'पाऊस सुरू असताना आमच्या फ्रेडीला (गोल्डन रिट्रिव्हर डॉग) भिजण्यापासून वाचवल्याबद्दल माझे @dearmanethan चे मनापासून आभार!'

वाचा :चिंताजनक! अमेरिकेत कोरोनाचे थैमान; एका दिवसात तब्बल ५२ हजार रुग्ण  

स्कॉटलॅडच्या गिफनॉकमधील मॉरिसन सुपरमार्केटमध्ये Ethan Dearman हे सुरक्षा रक्षक म्हणून पदावर आहे. श्वानाचे मालक मार्केटमध्ये गेल्यावर अचानक पाऊस आला. यामुळे मी त्याच्यावर छत्री धरल्याचे Ethan Dearman या सुरक्षा रक्षकाने सांगितले. याशिवाय Ethan Dearman यांनी एक ट्विट करत लिहिले आहे की, 'आज मी अनेक लोकांना आनंद देवू शकलो असे मला वाटत आहे.