Tue, Sep 29, 2020 19:58होमपेज › International › पीएम इम्रान खान यांना तिसऱ्या बायकोवर झालेली टीका झोंबली अन्‌ महिला आमदाराला...

पीएम इम्रान खान यांना तिसऱ्या बायकोवर झालेली टीका झोंबली अन्‌ महिला आमदाराला...

Last Updated: Jul 06 2020 9:33AM

संग्रहित छायाचित्रइस्लमाबाद : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने कथित ऑडिओ टेप लीक प्रकरणात महिला आमदार उझमा कारदार यांना पक्षातून निलंबित केले आहे. असा दावा केला जात आहे की उज्मा यांनी पत्रकार मित्राशी बोलताना इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी आणि पाकिस्तानी सैन्यावर सडकून टीका केली होती. ते संभाषण व्हायरल झाल्याने उज्मा यांची हकालपट्टी करण्यात आली. 

पीटीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी शिस्तभंगाच्या आरोपाखाली पंजाब विधानसभा सदस्य उज्मा कारदार यांना पक्षातून काढून टाकले आहे. पक्षाने मात्र याबाबत अधिक माहिती दिली नाही. २०१८ च्या निवडणुकीत पीटीआय उमेदवार म्हणून महिलांसाठी राखीव जागेवर कारदार विजयी झाल्या होत्या. त्या पंजाब प्रांतातील सर्वांत सक्रिय नेत्यांपैकी एक आहेत. 

उज्मा यांनी यात म्हटले होते की पंतप्रधान इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी पाकिस्तान चालवत आहे आणि पत्नीला विचारल्याशिवाय ते कोणतेही काम करू शकत नाहीत. त्या इम्रान खानचा चेहरा वाचतात. इम्रान यांचा दिवस कसा गेला याचीही त्यांना माहिती होते. 

या संभाषणादरम्यान उझमा असेही बोलताना ऐकण्यात येते की, इम्रान  यांना बुशराच मार्गदर्शन करत आहेत. बुशराने घरात एक ओळ काढली आहे आणि त्याच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. पूर्वी आम्ही आरामात इम्रान यांच्या घरी जात असू, परंतु बुशरा आल्यानंतर बाकीचे सोडून द्या, शाह महमूद कुरेशीही आत जाऊ शकत नाहीत.

या संभाषणादरम्यान उझमा यांनी पाकिस्तानी सैन्याबद्दल बरेच काही सांगितले. सरकारच्या कामात सैन्याचा पूर्ण हस्तक्षेप आहे आणि त्यात काय चूक आहे असा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानमध्ये नेहमीच असे घडले आहे. येथे सैन्याशिवाय कोणतेही सरकार चालवू शकत नाही. या संभाषणात त्यांनी आस्थापना नावाने सैन्याला संबोधित केले आहे.

 "