Tue, Sep 29, 2020 09:36होमपेज › International › नेपाळी पंतप्रधानांवरील संकट सोमवारपर्यंत टळले!

नेपाळी पंतप्रधानांवरील संकट सोमवारपर्यंत टळले!

Last Updated: Jul 04 2020 5:38PM
काठमांडू  पुढारी ऑनलाईन

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर राजीनाम्‍याची तलवार लटकत आहे. ओली यांना हटवण्यासाठी आज स्‍थायी समितीची बैठक होणार होती. मात्र अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. यामुळे ओली यांच्या भविष्‍याचा निर्णय सोमवारपर्यंत टळला आहे. असेही मानण्यात येत आहे की, पक्ष त्‍यांना आपल्‍या भारत विरोधी वागणे आणि राजकीय कामांबाबत आपले म्‍हणणे मांडण्यासाठी संधी देणार आहे. यासाठी नेपाळ कम्‍युनिस्‍ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि ओली यांचे विरोधी पुष्‍प कमल दहल 'प्रचंड' स्‍वत: त्‍यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

अधिक वाचा : भारत, अमेरिकेनंतर आता जपानकडून चीनला झटका देण्याची तयारी सुरु!

त्‍यामुळे आज सकाळी नेपाळ कम्‍युनिस्‍ट पक्षाची होणारी बैठक रद्द करण्यात आली. प्रचंड यांच्या प्रवक्‍त्‍याने सांगितलय की, अध्यक्षांनी ओली यांना चर्चेसाठी वेळ दिला आहे. दरम्‍यान या आधीही प्रचंड आणि ओली यांच्यामध्ये शुक्रवारी बैठक पार पडली होती. पक्षात फूट पडू नये यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीतून कोणताही फायदा झाला नसल्‍याचे समोर येत आहे. त्‍यामुळेच एनसीपीच्या ६५ सदस्‍यीय समितींला ओली यांच्या भविष्‍यावर निर्णय घ्‍यायचा होता. 

अधिक वाचा : कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी डब्‍ल्‍यूएचओ चीनमध्ये जाणार!

नेपाळी वृत्‍तपत्र द काठमांडू पोस्‍टच्या दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान ओली यांनी प्रचंड यांना पद न सोडण्याचे स्‍पष्‍टपणे सांगितले आहे. ओली यांनी आपण राजीनामा सोडून अण्य कोणत्‍याही चर्चेसाठी तयार असल्‍याचे म्‍हटले आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी ओली हे पक्षाच्या मोठ्या नेत्‍यांच्या भेटीगाठी घेत आहेत. इतकच काय तर अनेक नेत्‍यांच्या ऑफिस पासून घरापर्यत जाउन त्‍यांनी नेत्‍यांकडे आपल्‍याला पाठिंबा देण्याची विनवणी केली आहे. 

अधिक वाचा : चीनमधील कोरोनाबाबत 'डब्ल्यूएचओ'नं केला मोठा खुलासा

२०१८ मध्ये केपी शर्मा ओली आणि पुष्‍प कमल दहल यांनी कम्‍युनिस्‍ट पक्ष स्थापनेची घोषणा केली. मे २०१८ मध्ये या दोघांमध्ये एक करार झाला होता. त्‍यानुसार हे दोन्ही नेता  अडीच-अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सरकार चालवतील. दरम्‍यान २०१९ मध्ये एका नव्या करारानुसार ओली पूर्ण ५ वर्षे सरकार चालवणार होते. तर प्रचंड हे ५ वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष म्‍हणून ठरवण्यात आले होते. मात्र दरम्‍यानच्या काळात ओली यांच्या राजकीय निर्णयामुळे प्रचंड हे नाराज आहेत. त्‍यात प्रचंड यांनी नेपाळचे पंतप्रधान म्‍हणून ओली यांचे काम योग्‍य नसल्‍याचे म्‍हणत, त्‍यांनी ओली यांच्या राजीनाम्‍याची मागणी केली आहे. तसेच मे २०१८ मध्ये झालेल्‍या जुन्या करारानुसार प्रचंड यांनी स्‍वत:ला पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे. 

 "