Thu, Jan 28, 2021 03:21बाळ गमावल्याचं दु:ख काय असतं? मेघन मर्केलचा मोठा खुलासा

Last Updated: Nov 27 2020 1:20AM
लंडन : पुढारी ऑनलाईन  

ब्रिटेनची डचेस ऑफ ससेक्स आणि माजी अभिनेत्री मेघन मर्केलचा एक लेख न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये तिने आपल्या खासगी आयुष्याविषयी लिहिले आहे. तिने आपल्या दुसऱ्या बाळावेळी जी मोठी घटना घडली होती, ती किती दुर्देवी होती, याबद्दल धक्कादायक खुलासा मर्केलने केला आहे. 

मर्केलने लिहलं आहे की, 'आर्चीचे डायपर बदलल्यानंतर मला मोठी कळ आली. मी तिला कवेत घेऊन फरशीवर पडले मला माहिती होतं की, मी माझे दुसरे बाळ गमवलं आहे. मी माझ्या पहिल्या बाळाला घट्ट पकडलं. काही वेळानंतर मी हॉस्पिटलच्या बेडवर होते आणि मी माझ्या वडिलांच्या हाताला धरले होते. जुलै महिन्यात एका सकाळी ती आपली मुलगी आर्चीची देखभाल करताना हा प्रसंग घडला.' 

मर्केल पुढे लिहिते, एका बाळाला गमावण्याचा अर्थ एक असहनीय दुःख, याचा अनेक लोकांना अनुभव घेतला आहे. परंतु, काही जणांनीच आपला हा अनुभव सांगितला आहे. वेदना सुरू असताना मला आणि माझ्या पतीला हे समजलं की, त्या खोलीत १०० महिलांपैकी १० ते २० अशा महिला आहेत, ज्यांना गर्भपाताला सामोरे जावे लागले आहे. 

मार्केलद्वारा लेखमध्ये शेअर करण्यात आलेले खासगी गोष्टी या ब्रिटिश रॉयल फॅमिलीच्या सदस्यांच्या धोरणाच्या विरोदात आहे. या धोरमामुसार, कुणीही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बाबी शेअर करू सकत नाहीत. 

प्रिन्स हॅरीची आजी क्वीन एलिजाबेथने ६८ वर्षांच्या शासनकाळात कोणत्याही मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याची  चर्चा केलेली नाही.