Thu, Nov 26, 2020 20:53होमपेज › International › बायडन यांचा भ्रष्टाचार माध्यमे लपवत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

बायडन यांचा भ्रष्टाचार माध्यमे लपवत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

Last Updated: Oct 29 2020 1:49AM
वॉशिंग्टन ः वृत्तसंस्था 

अमेरिकेतील प्रमुख प्रसारमाध्यमे आणि बड्या आयटी कंपन्या ज्यो बायडन यांचा भ्रष्टाचार लपवत आहेत, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

ट्रम्प म्हणाले, प्रसारमाध्यमे बायडन यांचा भ्रष्टाचार लपवत आहेत. हे खूपच वाईट आहे. माध्यमे आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांसाठी हे युग वाईट मानले जाईल. अशा पद्धतीने भ्रष्टाचार लपवून माध्यमे आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांनी त्यांचेच नुकसान केले आहे. तसेच, त्यांनी स्वतःला मर्यादित करून ठेवले आहे. बायडन यांच्याकडून पैसे मिळत असल्यानेच प्रसारमाध्यमे हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत पक्षपाती आहे. हे माध्यमांचे स्वातंत्र्य नाही.