वाशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक समाज माध्यमांवरून त्यांची अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यात येत आहेत. नुकतेच ट्विटरने सुद्धा त्यांचे अकाऊंट काढून टाकले आहे. आता यात भर पडली आहे ती युट्यूब चॅनेलची. (Youtube channel of Donald Trump suspened for one week)
अधिक वाचा : तुर्कीच्या धार्मिक नेत्याला १ हजार ७५ वर्षांची शिक्षा!
युट्यूबने आज डोनाल्ड ट्रम्प यांचे चॅनेल हे एका आठवड्यासाठी बंद केले आहे. खुद्द युट्यूबच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांच्या चितावणीखोर पोस्टमुळे युट्यूबने ही कारवाई केली आहे. ही कारवाई २० जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. तर फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनीही २० जानेवारीपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची अकाऊंट बंद केली आहेत.
येत्या २० जानेवारीला नवनिर्वाचित ज्यो बायडन यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्यावर कारवाई झाली आहे.