वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन
जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना श्रीमंती पाहतो ना गरिबी. ज्याला आपली काळजी घेतली नाही त्याला झालाच कोरोना अशी सध्याची स्थिती आहे. आता या कोरोनाने जगातील सर्वात श्रींमत व्यक्तीच्या गर्लफ्रेंडला हेरले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कची गर्लफ्रेड ग्रीम्सला कोरोनाची लागण झाली आहे. (World's richest man Elon Musk’s girlfriend Grimes tests positive for COVID-19)
यावेळी ग्रीम्सने म्हटले की, अखेर तिला कोरोना झाला. (Finally got Covid) ग्रीम्स ही एक कॅनेडियन गायक असून तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. ग्रीम्सने आपल्याला कोरोनाची लागण झाली असून ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले. तसेच तिने याबाबत सांगताना, 'शेवटी मला कोरोना झाला. पण मी वेगळ्या पद्धतीने या तापाचा आनंद घेत आहे. २०२१ ("Finally got Covid but weirdly enjoying the Dayquil fever dream 2021) असे म्हटले आहे.
वाचा : भारताच्या नकाशातून काश्मीर, लडाख वगळले
याबाबत एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ग्रीम्सने आपल्या मुलाला किंवा एलन मस्क यांना कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याबाबत काहीही सांगितलेले नाही. मागच्याच आठवड्यात तिने आपल्या अल्बमचे रेव ऑडिशन लाँच केले होते. तिचा हा अल्बम खूपच लोकप्रिय झाला होता. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी मस्क यांनी कोरोना चाचण्या या 'निरुपयोगी आहेत' असे म्हटले होते. ज्यामुळे वाद निर्माण झाला होता.
वाचा : चार महिन्यांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाने इस्त्रायलच्या लोकांना दुबई 'सेक्स टुरिझम' का होत आहे?
एलन मस्क म्हणाले, काहीतरी बोगस सुरू आहे
स्पेस एक्स आणि टेसला कंपन्यांचे मालक एलन मस्क यांनी सांगितले की, त्यांना कोरोना झाला होता. मात्र त्याच दिवशी त्या चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरच एलन यांनी ट्विट करत, 'काहीतरी बोगस सुरू असल्याचे म्हटले होते. आज माझी चार वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यात दोन चाचण्या निगेटिव्ह तर दोन चाचण्या पॉझिटीव्ह आल्या होत्या. तेच मशीन, त्याच चाचण्या आणि तिच परिचारिका आणि बीडी कडून रॅपिड अँटीजेन टेस्ट.
वाचा : बेपत्ता इंडोनेशियन विमानाचा अद्याप शोध सुरूच
यावर एका युजर्स ने विचारले की, याच कारणांमुळे कोरोना प्रकरणात वाढ होत आहे का? त्यावर मस्कने उत्तर देत, जे माझ्या बाबतीत होत आहे, तेच इतरांच्या बाबतीत ही होत असल्याचे म्हटले. तसेच यावेळी मस्क यांनी सांगितले की,त्यांची पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन टेस्ट दुसऱ्या एका प्रयोगशाळेमधून झाली आहे. ज्यांचा अहवाल येण्यास २४ तास लागतील. तसेच मस्क यांनी ट्विट केले आहे की, 'मी वेगवेगळ्या लॅबमधून पीसीआर चाचणी घेत आहे. त्यांचा रिपोर्ट येण्यास अजून २४ तास लागतील. यावर एक युजर्स विचारले की, तुमच्यात काही लक्षणे होती का? त्यावर मस्कने उत्तर देताना, सर्दीची किरकोळ लक्षणे होती असे म्हटले आहे. याव्यतिरीक्त अशी कोणतीही वेगळी लक्षणे नाहीत.