नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
इटलीमधील कमीत कमी ९०० साक्षीदार आणि ३५० आरोपींचा समावेश असणारा ड्रॅगनटा खटला (Ndrangheta Trial) सुरु होत आहे. या खटल्याकडे फक्त इटलीचेच नाहीतर सर्व जगाच्या नजरा या खटल्याकडे लागले आहे. इटलीमधील अत्यंत शक्तीशाली, श्रीमंत आणि क्रूरकर्मा माफिया ड्रॅगनघेटा संघटनेवर विरोधात हा खटला चालवला जात आहे. या खटल्यात अनेक राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या खटल्यासाठी अत्यंत उच्चस्तरीय संरक्षणासह तब्बल एक हजार क्षमतेचे कोर्टरुम तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये आरोपींना ठेवण्यासाठी कोठडीही तयार करण्यात आली आहे. (The Trial start against the brutal mafia organization in Italy)
वाचा : Facebook, Twitter पाठोपाठ डोनाल्ड ट्रम्प यांना Google चा दणका
कोठडीमध्ये उभे केले जाणार आरोपी
या अत्यंत संवेदनशील खटल्यासाठी विशेष न्यायालय उभे करण्यात आले आहे. ज्याला अत्यंत उच्चस्तरीय संरक्षण ही देण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता पहिल्या टप्प्यातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान व्हिडिओच्या सहाय्याने आरोपींना न्यायालयात हजर होतील. तसेच जे न्यायालयात हजर राहतील त्यांच्या मधील अंतर २ मीटर इतके ठेवण्यात येणार आहे. २०१६ पासून याची तपासणी सुरु झाली. यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये इटलीमधील वेगवेगळ्या ११ शहरांमधून आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. या छापेमारीत तब्बल २५०० हून अधिक अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.
वाचा : तुर्कीच्या धार्मिक नेत्याला १ हजार ७५ वर्षांची शिक्षा!
हत्येपासून हवाला पर्यंतचे आरोप
तज्ज्ञांच्या मते या संघटनेला २०१० मध्ये इटलीतील कायद्यानुसार माफिया म्हणून घोषित करण्यात आले होते. १९८० ते ९० च्या दशकात ही संघटना खूपच चर्चेत आली कारण तेव्हा इटलीमध्ये अनेक अपहरणाच्या घटना समोर आल्या. यांनीच येथील तेल व्यापारी जॉन पॉल गेटीच्या नातवाची हत्या केल्याचे म्हटले जाते. या संघटनेमार्फत ड्रग्जचा व्यापार, खंडणी आणि हवाला सारखे काम केले जात होते.
या संघटनेच्या क्रूरतेबद्दल येथे अनेक किस्से सांगितले जातात. या संघटनेच्या संपर्कातील व्यक्तीस येथील महिलेने आपली जमीन विकली नाही. तर त्या महिलेची हत्या करण्यात आली. शिवाय त्या महिलेच्या शरीराचे तुकडे करुन ते डुकरांना खाण्यासाठी घालण्यात आले. १९५० नंतर अनेक मुलांच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप या संघटनेवर आहे.
वाचा :जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या गर्लफ्रेंडला कोरोना!
या संघटनेत नेत्यांपासून व्यापाऱ्यांचा समावेश
ही माफिया संघटना जगभरातल्या मोठ्या माफिया संघटने पैकी एक मानली जाते. इटली सोडून इतरही देशांमध्ये या संघटनेचा प्रभाव आहे. जर्मनी, स्विर्झलँड आणि बुल्गेरिया येथील माजी खासदार, मोठ्या पदावरील पोलिस अधिकारी, स्थानिक नेते आणि व्यापारी ही या संघटनेला मदत करत होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या खटल्याशी निकडीत अधिकारी सांगतात की या संघटनेतील लोक आपल्या गावातूनच अनेक गुन्ह्यांमध्ये कार्यरत असत. लपून राहण्यासाठी या लोकांनी घरांच्या खाली मोठ मोठी बंकर आणि बोगदे खणून ठेवले होते. अनेक डोंगरांमध्ये बंकर तयार करुन ठेवले गेले होते. शिवाय जंगलांमध्ये ही लपण्याची ठिकाणे तयार करण्यात आली होती. या गुन्हेगारीत सहभागी लोक एकमेकांचे नातेवाईकच होते. त्यामुळे ते एकमेकांचे रहस्य लपवून ठेवत असत.