Wed, Oct 28, 2020 10:42होमपेज › International › कर्ज देणार नाही, तेलाचा पुरवठाही नाही, घेतलेले पैसेही परत करा; पाकिस्तानला सौदीकडून तगडा हादरा!

कर्ज देणार नाही, तेलाचा पुरवठाही नाही, घेतलेले पैसेही परत करा; पाकिस्तानला सौदीकडून तगडा हादरा!

Last Updated: Aug 14 2020 1:15AM

संग्रहित छायाचित्ररियाध : पुढारी ऑनलाईन

दहशतवादाची फॅक्टरी म्हणून जगाच्या पटलावर उदयाला आलेल्या आणि भारताचा द्वेष हाच एक कलमी कार्यक्रम घेऊन जगभर फिरणाऱ्या पाकिस्तानला तगडा झटका बसला आहे. सौदी अरेबियाने अतिशय मोठा निर्णय घेताना पाकिस्तानला कर्ज आणि तेल पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून असलेल्या उभय देशांमधील मैत्रीचा आता अधिकृतपणे शेवट झाला आहे. मीडल ईस्ट मॉनिटरने याबाबत वृत्त दिले आहे. 

अधिक वाचा : चिंताजनक! न्यूझीलंडमध्ये तब्बल १०२ दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव

सौदीने पाकिस्तानला तगडा झटका देताना तब्बल १ कोटी अमेरिकन डॉलर परत करण्याचे फर्मान काढले आहे. सौदीकडून नोव्हेंबर २०१८ मध्ये पाकिस्तानला ६.२ बिलीयन डॉलरच्या अर्थसहाय्यतेची घोषणा केली होती. यामधील तीन बिलीयन डॉलर कर्ज स्वरुपात, तर उर्वरित ३.२ बिलीयन ऑईल क्रेडिट फॅसिलीटीसाठी देण्यात आले होते. हा करार सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचा द्विपक्षीय दौरा केल्यानंतर झाला होता.

अधिक वाचा : जपानच्या सागरी हद्दीत चीनची घुसखोरी 

पाकिस्तान परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सौदी अरेबिया नेतृत्व करत असलेल्या इस्लामिक सहकार्य संघटनेला (ओआयसी) भारताविरोधात काश्मीर मुद्यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याने इशारा दिला होता. कुरेशी यांनी सौदीला आव्हानात्मक भाषेचा वापर केला होता. त्यांनी पाकिस्तानस्थित चॅनेल एआरवायशी बोलताना म्हटले होते की, जर तुम्ही (सौदी अरेबिया) काश्मीर मुद्यावर भूमिका घेण्यास तयार नसाल, तर मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बैठक बोलावण्यास सांगेन. 

अधिक वाचा : व्हाइट हाऊस बाहेर गोळीबार, ट्रम्प बचावले!

भारताने काश्मीर विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला होता. त्यांचा उठलेला पोटशूळ अजूनही शमलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने इस्लामिक देशांनी भूमिका घ्यावी असा अट्टाहास सुर आहे. तथापि कोणत्याच देशाने त्यांना अजून भीक घातलेली नाही. आता  भूमिका राहिली बाजूला, पण सौदीने दिलेला तगडा झटका पाकिस्तानच्या वर्मी लागला आहे. 

अधिक वाचा : ड्रॅगनने टाकलेल्या गुंतवणुकीच्या जाळ्यात बांग्लादेशही अडकणार!

 "