Wed, Aug 12, 2020 00:04होमपेज › International › 'जोसेफ स्टॅलिन’ यांना मागे टाकून रशियात पुतीन सर्वाधिक काळ सत्तेत राहणार!

'जोसेफ स्टॅलिन’ यांना मागे टाकून रशियात पुतीन सर्वाधिक काळ सत्तेत राहणार!

Last Updated: Jul 02 2020 8:09PM

संग्रहित छायाचित्र : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीनमॉस्को : पुढारी ऑनलाईन 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या पदाची मुदत २०२४ मध्ये संपत आहे. मात्र, या मुदतीनंतरही त्यांनाच अध्यक्षपदी ठेवणार्‍या घटनादुरुस्तीला रशियन जनतेने बहुमत दिले.

रशियन राजकारणात आपले वर्चस्व कायम राखण्यात पुतीन यांना नेहमीप्रमाणे यश आले आहे. पुतीन हेच २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम असावेत म्हणून झालेल्या घटनादुरुस्ती मतदानात रशियन जनतेने पुतीन यांच्या पारड्यात वजन टाकले. आता पुतीन हे जोसेफ स्टॅलिन यांच्यापेक्षा जास्त काळ सत्तेवर असणारे नेते ठरतील.

आठवडाभर घटनादुरुस्तीसाठीचे मतदान सुरू होते. ७७ टक्के लोकांनी पुतीन यांच्या बाजूने कौल दिला. या घटनादुरुस्तीमुळे पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या दोन टर्म पूर्ण करता येतील. घटनादुरुस्ती झाली नसती तर पुतीन यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येणार होता.