Sat, Aug 08, 2020 11:58होमपेज › International › 'खरी अयोध्या नेपाळमध्ये; श्रीराम भारताचे नव्हेत, तर नेपाळचे'!

'खरी अयोध्या नेपाळमध्ये; श्रीराम भारताचे नव्हेत, तर नेपाळचे'!

Last Updated: Jul 13 2020 10:43PM
काठमांडू : पुढारी ऑनलाईन

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची सत्ता संकटात असल्याने सध्या अनेक वादग्रस्त वक्तव्ये भारताविरोधात करत आहेत. त्यांनी आज (ता.१३) खळबळजनक दावा केला आहे. सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केली असून खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे, असे म्हटले आहे. ओली यांनी त्यावेळी वाहतूक व मोबाईल फोन (दळणवळणाची साधने) नव्हती, मग राम जनकपुरात कसे आले? असा सवाल विचारला.

नेपाळी कवी भानुभक्त आचार्य यांच्या २०६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ब्ल्यू वॉटर येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या छळ झाला आहे. ऐतिहासिक वस्तुस्थितीशी छेडछाड झाली आहे. आमचा अजूनही विश्वास आहे की आम्ही सीता भारतीय राजपुत्र रामला दिली होती.

आम्ही सीतेला भारताच्या अयोध्या राजपुत्रांना दिले नाही, तर नेपाळच्या अयोध्या राजपुत्रांना दिली. अयोध्या हे बीरगंजच्या अगदी पश्चिमेला गाव आहे. भारतात बनवलेली अयोध्या खरी नाही. ओली यांनी असा युक्तिवाद केला की, जर भारताची अयोध्या खरी असेल तर राजकुमार तेथून लग्नासाठी जनकपुरात कसा येऊ शकेल? विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती नेपाळमध्ये झाली आणि विकसित झाली असा दावा त्यांनी केला.