पुढारी ऑनलाईन डेस्क
समाजातील काही घटना पाहिल्या की, जगात कधी काय होईल सांगता येत नाही, अशी भावना तयार होते. आता हेच घ्या ना... पतीच्या स्वप्नात एक क्रमांक आला आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितला. पत्नी त्याच क्रमांकाची लाॅटरी खरेदी केली आणि चक्क काही वेळातच ती ६० मिलियन अमेरिकी डाॅलर म्हणजेच ४३७ कोटी रुपयांची मालकीण झाली आहे आश्चर्य वाटले ना... अशा कथा आपण खूप ऐकल्या असतील; पण ही घटनी खरी आहे.
वाचा ः दिल्ली हिंसाचाराच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
नेमकी घटना काय? तर, ही महिला कॅनडामधील टोरंटोमध्ये राहणारी आहे. तिचं वय ५७ वर्षे असून तिचं नाव डेंग प्रवतुडोम असे आहे. आता या डेंगचे असे म्हणणे आहे की, तिच्या पतीने २० वर्षांपूर्वी एक स्पप्न पाहिले होते. त्या स्वप्नात त्यांनी एक लाॅटरी खरेदी केलेली होती. त्या लाॅटरीमधील काही क्रमांक पत्नीला सांगितले. त्याच क्रमांकानी या महिलेला ४३७ करोड रुपये जिंकण्यासाठी मदत केली.
वाचा ः प्रजासत्ताक दिनी आपणच राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे चुकीचं : हजारे
डेंग प्रवतुडोम मागील २० वर्षांपासून लाॅटरी खरेदी करत होती. ती आपल्या पतीने स्वप्नात पाहिलेल्या क्रमांकाची लाॅटरी खरेदी करत होती. शेवटी खूप वाट पाहिल्यानंतर त्या महिलेला लाॅटरी जिंकण्यात यश मिळालं. कॅनडाच्या ओन्टरियो लाॅटरी एण्ड गेमिंगने डेंग प्रवतुडोम यांनी ४३७ कोटी रुपये जिंकल्याची पुष्टी केलेली आहे. या घटनेत विशेष हे की, डेंगच्या पतिला आपल्या पत्नीने लाॅटरी जिंकल्याची माहिती होती. मात्र, डेंगला विश्वास बसत नव्हता. जेव्हा तिला ४३७ कोटी रुपयांचा चेक देण्यात आला तेव्हा तिला खात्री पटली. डेंग म्हणते की, या पैशाने मी मोठे घर खरेदी करणार आहे आणि अख्खे जग फिरणार आहे.