Tue, Aug 11, 2020 23:56होमपेज › International › भ्रष्ट नेत्यांच्या मदतीने चीनचे देशांवर वर्चस्व

भ्रष्ट नेत्यांच्या मदतीने चीनचे देशांवर वर्चस्व

Last Updated: Jul 14 2020 1:26AM
काठमांडू : पीटीआय

चीन अविकसित गरीब देशांतील भ्रष्ट नेत्यांचा वापर करुन त्या देशावर चीन वर्चस्व मिळवित असल्याचे आतापर्यंतच्या उदाहरणावरुन स्पष्ट  झाले आहे. नेपाळ हे त्याचे ताजे उदाहरण असल्याचा दावा ग्लोबल वॉच अ‍ॅनालेसिसच्या अहवालात करण्यात आला आहे. त्यानुसार नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना लाच देऊन चीनने नेपाळमध्ये प्रवेश मिळविला आहे.  त्यामुळे ओली यांच्या मालमत्तेत कमालीची वाढ झाली आहे.  परदेशातही त्यांनी मालमत्ता घेतली आहे.

या अहवालानुसार ओलींचे स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे मीराबोड बँकेत खाते आहे. त्यात 5.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 41.34 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी  ही रक्कम दीर्घ मुदतीच्या ठेवी आणि समभागांच्या रूपात गुंतवणूक केली आहे. ओली आणि त्यांची पत्नी राधिका शाक्य यांना दरवर्षी सुमारे 1.87 कोटी रुपयांचा फायदा होत आहे. चीन गरीब देशांच्या भ्रष्ट नेत्यांच्या मदतीने संबंधित देशांमध्ये चिनी कंपन्या पाठविते. त्यानंतर हळूहळू त्या देशाच्या राजकारणात हस्तक्षेप सुरु करतो. 

ओली यांनी 2015-16मध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळात कंबोडियाच्या दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक केली. यासाठी त्यांना नेपाळमध्ये चीनचे तत्कालिन राजदूत व्ही चुन्ताई यांनी मदत केली. हा व्यवहार ओली यांचा जवळचे मित्र नेपाळचे व्यापारी अंग शेरिंग शेरपा यांनी निश्चित केला होता. यामध्ये कंबोडियाचे पंतप्रधान म्हणून सेन आणि चिनी मुत्सदी फेनम पेन,  जिआंगिओ यांनीही मदत केली.

ओली यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळात डिसेंबर 2018मध्ये डिजिटल अ‍ॅक्शन रुम बनविण्याचे काम चिनी दूरसंचार कंपनी हुवेईला दिले होते. तर मे 2019मध्ये नेपाळ दूरसंचारने रेडीओ एक्सेस नेटवर्कचे काम हाँगकाँगच्या एका चीनी कंपनीला दिले. 

चीनच्या जेटीई कंपनीबरोबर फोर जी नेटवर्क सुरु करण्याचे काम दिले होते. हे दोन्ही उपक्रम 130 मिलियन युरो म्हणजेच सुमारे 1106 कोटी रुपयांचे होते. यामध्ये ओली यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.