Thu, Oct 29, 2020 07:45होमपेज › International › चीनकडून लिंशियातील अनेक मशिदींची तोडफोड

चीनकडून लिंशियातील अनेक मशिदींची तोडफोड

Last Updated: Sep 21 2020 2:27AM
लिंशिया (चीन) : वृत्तसंस्था

चीनच्या गान्सू प्रांतातील लिंशिया येथे मशिदी पाडल्या जात असून, मशिदींच्या जागी चिनी सांगाडे (ढाचे) उभारले जात आहेत. इमारतींची शैली चिनी पद्धतीची केली जात आहे. चीनविरुद्ध उईघर मुस्लिमांच्या दमनाचा आरोप जगभरातून होत असतानाच मशिदींसंदर्भातील या बातम्या चीनमधून बाहेर पडल्या आहेत.

शी जिनपिंग यांचा चिनी कम्युनिस्ट पक्ष मुस्लिमांवर सातत्याने अत्याचार करत आहे. शिनजियांग प्रांतातील उईघर मुस्लिमांची संस्कृती मिटविण्याचे चीनचे धोरण आहे. आता गान्सूतील लिंशियातील मुस्लिमांवर चीनने मोर्चा वळविला आहे. मशिदींचे घुमट तोडले जात असून, इमारतींना चिनी शैलीबरहुकूम केले जात आहे. आतूशमध्ये मशीद पाडून मशिदीच्या जागी सार्वजनिक शौचालय चीनने बांधल्याची बातमीही नुकतीच आली होती.

चीनमधील ‘छोटा मक्‍का’

चीनमधील छोटा मक्‍का अशी लिंशिया शहराची ओळख आहे; पण ती पुसून टाकण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत. उपग्रहीय छायाचित्रांतून ही बाब समोर आली आहे, हे विशेष होय. अनेक मशिदींचे छत अशाप्रकारे बनविले जात आहे की, त्या चिनीच वाटाव्यात. इस्लामिक छाप त्यावर असू नये. लिंशियातील लहानसहान मशिदींनाही लक्ष्य केले जात आहे.

 "