Tue, Sep 29, 2020 18:05होमपेज › International › 'त्याबाबत' चीनकडून प्रथमच कबुलीनामा!

'त्याबाबत' चीनकडून प्रथमच कबुलीनामा!

Last Updated: Jul 06 2020 1:30AM
बीजिंग : वृत्तसंस्था

पूर्व लडाखमध्ये तणाव वाढविणार्‍या आणि नेपाळला भारताविरोधात भडकावणार्‍या चीनने भूतानसोबत सीमावाद असल्याची प्रथमच जाहीरपणे कबुली दिली आहे. त्यांची ही कबुली भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

अरुणाचल प्रदेशला लागूनच भूतानची पूर्वेकडील सीमा आहे. याच भागात सीमावाद असल्याचा दावा चीनने वारंवार केला आहे. भूतानसोबतचा आमचा सीमावाद संपलेलाच नाही. पूर्व, मध्य आणि पश्‍चिमेकडील भागांत कित्येक वर्षांपासून हा सीमावाद सुरू आहे. आम्ही हा वाद द्विपक्षीय चर्चेतून सोडवू, तिसर्‍या देशाने यात मध्यस्थी करू नये, असे सांगत चीनने या सीमावादाची जाहीर कबुली दिली आहे. मध्यस्थी न करण्याचा हा सल्ला चीनने भारताला उद्देशून  दिला आहे. 

1984 ते 2016 या 32 वर्षांत आतापर्यंत भूतानसोबत 24 वेळा चर्चा झाली आहे. त्यात पश्‍चिम आणि मध्य क्षेत्रातील वादावरच चर्चा झाली असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.  भूतानमधील सूत्रांनीही चीनसोबत यापूर्वी कधीही  पूर्व क्षेत्रातील वादावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले. 

 "