Mon, Sep 28, 2020 07:20होमपेज › Goa › कुडचडे मतदारसंघात महिलांचे अधिक मतदान

कुडचडे मतदारसंघात महिलांचे अधिक मतदान

Published On: Apr 23 2019 11:49AM | Last Updated: Apr 23 2019 11:51AM
मडगाव : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दक्षिण गोव्यातील कुडचडे मतदारसंघ अव्वल ठरला. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. ९ वाजेपर्यंत कुडचडे मतदारसंघात सर्वात जास्त १९ टक्के एवढे मतदान नोंद झाले. 

कोणकोण मतदारसंघात १६ टक्के मतदान नोंद करण्यात आले. कुडतरी मतदारसंघात सकाळी ९ वाजे पर्यंत १५ टक्के मतदान झाले होते. बाणावली ११ टक्के, कुंकळ्ळी १३ टक्के, दाबोळी १२ टक्के, फातोर्डा १३ टक्के, मडकई १२, मडगाव १३, मुरगाव १३, नावेली १२, नुवे १४, फोंडा १३, केपे १३ सांगे १४, सावर्डे साडे बारा, शिरोडा १३, वास्को ९,  वेळ्ळी १२ टक्के, एवढे मतदान सकाळी ९ पर्यंत नोंद करण्यात आले होते. 

मडगाव येथे सकाळी ९ पर्यंत मडगावच्या मतदार केंद्रात भेट दिल्यावर प्राप्त माहितीनुसार सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान्त अनेकांनी मतदान केले असून अनेक केंद्रात महिलांनी सर्वाधिक हजेरी लावली. सकाळी बूथ क्रमांक २७, ३४,  ३५, ३७,३८, या मतदान केंद्रात सकाळी ७ ते ९ पर्यंत  जास्त प्रमाणात महिलांनी मतदान केले आहे. मडगाव महिला नूतन हायस्कूल, फातिमा हायस्कूल, तसेच मडगाव नगरपालिका येथे नेमण्यात आलेल्या मतदान केंद्रात सर्वाधिक मतदारांना मतदान केले असून सर्वाधिक  महिला मतदारांची नोंद झाली आहे. 

मतदान केंद्रावर महिलांची संख्या अधिक

दवर्ली येथील मतदान केंद्रावर महिलांची संख्या जास्त होती. एकूण मतदारांपैकी १३ टक्के महिलांनी या मतदार केंद्रावर मतदान केले होते. या मतदार केंद्रात महिलांची संख्या लक्षणीय होती. माडाची झावळी लावून हे मतदान केंद्र सजविण्यात आले होते. तसेच रॅम्पवर फुलांच्या माळा लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.