Sun, Aug 09, 2020 04:26होमपेज › Goa › पणजी : केंद्रीय अर्थसंकल्प जनविरोधी; आयटककडून निषेध 

पणजी : केंद्रीय अर्थसंकल्प जनविरोधी; आयटककडून निषेध 

Last Updated: Feb 14 2020 1:08PM

पणजी : आयटक गोवातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पाचा निषेध पणजी : पुढारी वृत्तसेवा 

एनडीए सरकारने संसदेत मांडलेला  केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 हा  निराशजनक आहे. सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पात  कसलीच तरतूद करण्यात आली नसून तो जनविरोधी असल्याचा आरोप करुन त्याचा निषेध करण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानावर आयटक गोवातर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.

केंद्रीय अर्थसंकल्प जनविरोधीत तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडलेला गोवा राज्याचा अर्थसंकल्प हा अर्थहीन असल्याची टीका आयटकचे सचिव अ‍ॅड. राजू मंगेशकर  यांनी केली.

फोन्सेका म्हणाले, की एनडीए सरकारने संसदेत अर्थसंकल्प मांडला. मात्र या अर्थसंकल्पात रोजगार वृध्दी तसेच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसलीच तरतदू करण्यात आलेली नाही. देशात आज रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र नव्या रोजगार संधी तयार करणे तसेच रोजगारभिमुख उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारकडून या अर्थसंककल्पात कसलीच पावले उचलण्यात  आलेली नाहीत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यया संदर्भात देखील कसलाच उल्‍लेख करण्यात आला नसल्याची टीका त्यांनी  केली.