Sun, Sep 20, 2020 09:04होमपेज › Goa › गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला लॉकडाऊनचा फटका 

गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला लॉकडाऊनचा फटका 

Last Updated: Apr 06 2020 4:18PM

लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून शॅक काढताना व्यवसायिकपणजी : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाव्हायरच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका गोव्याच्या पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. राज्यात ऑक्टोबर ते मे महिना हा पर्यटनाचा काळ. पर्यटन हंगामातच कोरोनाची लागण झाल्याने राज्यात देशी तसेच विदेशी पर्यटक येणे बंद झाली आहेत. त्यामुळे शॅक मालकांनी राज्यातील किनारी भागात पर्यटनाच्या जोरावर उभारलेले शॅक काढायला सुरूवात केली आहेत.    

होम क्वारंटाईनवर आता ‘कोविड लोकेटर’ची नजर

राज्यात सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात पर्यटक येणे अपेक्षित होते. परंतु, आरोग्याला जपून लोक लॉकडाऊन काळात घरीच असल्याने पर्यटन क्षेत्रावर मोठा परीणाम झाला आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. शॅक व्यवसायिकांना देखील कोरोनामुळे जबर फटका बसला आहे. राज्याच्या पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून शॅक व्यवसायावर गदा आली आहे. पर्यटकच नसल्याने यंदाचा पर्यटन हंगाम नुकसानीत गेला असल्याची प्रतिक्रिया शॅक मालक तसेच अन्य व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.   

'विदेशात बोटींवर अडकून पडलेल्या खलाशांना मायदेशी आणा'

शॅक व्यवसायिकांनी पर्यटन हंगाम संपण्याच्या आधीच समुद्रकिनार्‍यावरचे शॅक्स काढायला सुरूवात केली आहे. यंदाच्या हंगामात आधीच शॅक वितरणाला विलंब झाला होता. त्यानंतर उशीराने सुरू झालेला शॅक व्यवसाय देखील कोरोनामुळे बंद करावा लागत आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्यांचे मोठे नुकसान झाल्याचे शॅक मालकांनी सांगितले.

टीटीएजीचे अध्यक्ष सावियो मसायस म्हणाले, की कोरोनामुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय मंदावला आहे. मात्र, कोरोनाचे संकट गेल्यावर हा व्यवसाय पुन्हा उभारी घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 "