Sat, Aug 15, 2020 15:57होमपेज › Goa › 'नव्या राजभवनाची सध्या गरज नाही'

'नव्या राजभवनाची सध्या गरज नाही'

Last Updated: Aug 02 2020 1:32AM

राज्यपाल सत्यपाल मलिकपणजी : पुढारी वृत्तसेवा

नवे राजभवन उभारण्यास राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आक्षेप घेत सरकारला चपराक दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राज्यपालांनी पत्र पाठवले आहे. यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत नव्या राजभवनाचा प्रस्ताव स्थगित करावा असे निर्देश आज (ता.१) शनिवार  दिले. पोतुर्गिजकालीन काबो राजभवन  दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरी करुन नवे  राजभवन उभारले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. 

अधिक वाचा : उसाला प्रती टन रु. 1800  आधारभूत किंमत निश्‍चित 

नव्या राजभवनाच्या विषयावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. नवे राजभवन उभारुन  सध्याचे काबो राजभवन विकण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र आता सरकारच्या प्रस्तावावर खुद्द राज्यपालांनीच आक्षेप नोंद केला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी २७ जुलै रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र पाठवले आहे. 

अधिक वाचा : ’राजभवनचा कॅसिनो, रिसोर्ट करण्याचा डाव’

राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहताना नवे राजभावन उभारण्याचा निर्णय स्थगित करावा. राज्य सध्या कोरोना संसर्गाची लढा देत आहे. त्यातच आर्थिक स्थितीत सुध्दा ठीक नाही. अशा स्थितीत  नवे राजभवन उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय पूर्णपणे अयोग्य आहे. नवे राजभवन उभारुन राज्यावर अतिरीक्त आर्थिक बोजा पडणार आहे ते सध्याच्या स्थितीत ठीक नाही. राज्यपाल म्हणून आपले काम मर्यादीत असून नव्या राजभवनाची गरज नसल्याचेही  राज्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे.