Mon, Sep 21, 2020 04:32होमपेज › Goa › गोवा : एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह 

गोवा : एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह 

Last Updated: Apr 09 2020 2:56PM
पणजी (गोवा) : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील सात कोरोनाबाधीत रुग्णांपैकी एक रुग्ण बरा झाला असून त्याचे दोन अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. सदर रुग्णाला डिस्चार्ज दिले जाऊ शकत असले तरी त्याला पुढील १४ दिवस ‘विलगीकरण’ केंद्रात ठेवले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

वाचा - 'आपण हाक द्या, हा सिंघम आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील'

राज्यातील सात कोरोनाबाधीत रुग्णांना मडगाव येथील ‘कोविड इस्पितळात’ ठेवण्यात आले आहे. यातील एका रुग्णाचा बुधवारी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. आरोग्यमंत्री राणे म्हणाले, 'राज्यातील हा पहिला कोरोनाबाधीत रुग्ण बरा झाला असून आता सहा बाधीत रुग्ण उरले आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या रुग्णाला १४ दिवस ‘विलगीकरण’ केंद्रात ठेवून त्याचे अहवाल पुन्हा तपासल्यानंतरच त्याला घरी जाण्यास दिले जाणार आहे. कोरोनामुळे राज्यात अजून एकही मृत्यू झालेला  नाही. आता राज्यात सहा कोरोना बाधित रुग्ण असून तेही लवकरच बरे होण्याच्या मार्गावर आहेत. आरोग्य खात्याच्या सर्व डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचार्‍यांची प्रामाणिक सेवा आणि परिश्रमाबद्दल आपण आभारी आहे.' असेही ते म्हणाले.

वाचा - 'या' राज्याने लॉकडाऊन वाढवला थेट ३० एप्रिलपर्यंत!

 "