Mon, Sep 21, 2020 06:12होमपेज › Goa › पणजी : मेरशी पंचायतीच्या माजी सरपंचाची आत्महत्या

पणजी : मेरशी पंचायतीच्या माजी सरपंचाची आत्महत्या

Last Updated: Jan 18 2020 1:29AM
पणजी : प्रतिनिधी

तिसवाडी तालुक्यातील  मेरशी पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य  प्रकाश  नाईक  यांनी आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्या लागल्याच्या जखमा आढळून आल्या. प्रथमदर्शनी सदर प्रकार आत्महत्येचा वाटत असला तरी  नाईक यांच्याकडे चिठ्ठी आढळून आली आहे. 

यात  त्यांनी  दोन व्यक्‍तींच्या नावांचा उल्‍लेख केला असून ते  आपली  ब्लॅकमेलिंग व फसवणूक  करीत असल्याचा आरोप  केला आहे. नाईक यांच्या मृत्यूवर संशय व्यक्‍त करुन  त्यांचे कार्यकर्त्यांनी  जुने गोवे पोलिसस्थानकावर गर्दी केली आहे.

 "