होमपेज › Goa › गोवा कॅन संस्थेतर्फे ग्राहक हक्क आणि जबाबदार जागरुकता मोहिम 

गोवा कॅन संस्थेतर्फे ग्राहक हक्क आणि जबाबदार जागरुकता मोहिम 

Last Updated: May 28 2020 5:27PM

रोलँड मार्टिन्सपणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा कॅन संस्थेतर्फे ग्राहक हक्क आणि जबाबदार जागरुकता मोहिम सुरू करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या ग्राहक साक्षरता मोहिमेचा एक भाग म्हणून ही जागृकता मोहिम सुरु केली आहे. वस्तू खरेदी करतेवेळी ग्राहकांना त्यांचे हक्क सांगण्यासाठी आणि त्यांच्या जबाबदार्‍यांबद्दल समजावण्यासाठी ही मोहिम असून, मोहिम २५ जून पर्यंत राज्य ग्राहक हक्क दिनापर्यंत चालणार आहे, अशी माहिती संस्थेचे निमंत्रक रोलँड मार्टिन्स यांनी जारी केलेल्या पत्रकाव्दारे दिली आहे.

वाचा : विलगीकरणातील १५४ खलाशी घराकडे

ग्राहक संरक्षण कायदा २०१९, वजन आणि मापांचे मानक (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम १९७७, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६, अत्यावश्यक वस्तूंचा कायदा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि बीआयएस कायदा २०१६ या संदर्भात जनजागृती मोहिमे दरम्यानच्या उपक्रमांत ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती दिली जाईल.

जागरूकता मोहिमेचे लक्ष्य अन्न सुरक्षेवर अधिक असेल. पॅकेज्ड खाद्यपदार्थ आणि रसायनयुक्त पिकविलेल्या अन्नाची माहिती व्हावी यासाठी ग्राहकांना सतर्क केले जाईल. उत्पादनाबाबत देखील ग्राहकांना माहिती दिली जाईल. एलपीजी सिलिंडर आणि इलेक्ट्रिकल उपकरणे ज्यात आयएसआय मार्क असणे आवश्यक आहे, याची माहिती दिली जाईल.

वाचा :बार, रेस्टॉरंट्स १ जूनपासून सुरू होण्याची शक्यता : मंत्री मायकल लोबो