Mon, Sep 21, 2020 04:27होमपेज › Goa › गोवा सरकारचा राज्य निवडणूक आयोगावर दबाव? : काँग्रेस

गोवा सरकारचा राज्य निवडणूक आयोगावर दबाव? : काँग्रेस

Last Updated: Mar 11 2020 6:55PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

सरकारकडून राज्य निवडणूक आयोगावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला. सरकारकडून जिल्हा पंचायत निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

जिल्हा पंचायत निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असली तरी अजूनही काँग्रेस पक्षाला मतदारयादी उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मतदार यादी डिजीटल स्वरुपात उपलब्ध  करावी असे पत्र काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

चोडणकर म्हणाले, की  जिल्हा पंचायत निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. 2017च्या विधाननसभा निवडणुकीत जनतेचे दिलेला कौल भाजपने पाळला नाही. भाजप सरकारने जनादेशाचा अनादर केला आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून जनता सरकारला कठोर संदेश देत योग्य तो धडा शिकवेल. जिल्हा पंचायत निवडणुका जवळ आल्या तरी अजूनही राज्य निवडणूक आयोगाकडून काँग्रेसकडून मतदारयादी देण्यात आलेली नाही. मतदारयादी मागितली तरी उडउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे त्यांनी  सांगितले.

 "