Mon, Sep 21, 2020 06:18होमपेज › Goa › गोवा : जिल्‍हा पंचायत निवडणूक; 'आप'कडून सहा उमेदवारांची घोषणा 

गोवा : जिल्‍हा पंचायत निवडणूक; 'आप'कडून सहा उमेदवारांची घोषणा 

Last Updated: Mar 04 2020 1:31AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून (आप) मंगळवारी उत्तर गोव्यातील सहा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. उर्वरीत उमेदवारांच्या नावांची घोषणा येत्या दोन दिवसांत केली जाईल, असे पक्षाचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यातील तळागळातील प्रशासन तसेच राजकारण मजबूत करुन त्याला चालना देण्याच्या उद्देशाने आपकडूनही जिल्हा पंचायत निवडणूक लढवली जात असल्याचे त्यांनी  सांगितले. 

आपचे नेते प्रदीप पाडगावकर म्हणाले की, पक्षाकडून यापूर्वी जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी दक्षिण गोव्यातील नऊ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. तर आता उत्तर गोव्यातील सहा मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. उत्तर गोव्यातील हळदोणे येथून स्मिता शेट, शिरसई येथून  गॉडफ्रे डी. लिमा, कळंगुट येथून मान्युएल कार्दोज, सुकुर येथून मारीओ कोरदेरो, होंडा येथून पुंडलिक माडकर व धारगळ येथून प्रसाद विर्नोडकर हे  जिल्हा पंचायत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 "