Mon, Sep 21, 2020 06:09होमपेज › Goa › गोवा : टॅक्सी, रिक्षा, पिकअप व्यवसायिकांना सूट द्यावी : दामू नाईक 

गोवा : टॅक्सी, रिक्षा, पिकअप व्यवसायिकांना सूट द्यावी : दामू नाईक 

Last Updated: Apr 15 2020 6:22PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

देशासह राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असल्याने मोटर सायकल पायलट, टॅक्सी, रिक्षा, पिकअप व्यवसायिक संकटात सापडले आहेत. त्यांना आर्थिक सहकार्य करावे तसेच रस्ता करात सूट द्यावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते दामू नाईक यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो येथील निवास्थानी बुधवारी नाईक यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हा विषय मांडला.

अधिक वाचा : सरकारी कार्यालये तूर्तास बंदच

मोटरसायकल पायलट संघटनेचे पदाधिकारी, तसेच रिक्षा संघटना, टॅक्सी आणि पिकअप चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सध्या लॉकडाऊनच्या काळात त्यांना निर्माण झालेल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यांना रस्ता करात थोडी सूट देणे तसेच आर्थिक सहकार्य करण्याची मागणी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे आपण केली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

अधिक वाचा : दक्षिण गोवा हरित जिल्हा : मुख्यमंत्री

हे समाजातील लहान घटक आहेत आणि सध्या त्यांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांना समस्या निर्माण होत आहेत. मुख्यमंत्री संबंधीत अधिकारी आणि आमदारांना विश्‍वासात घेऊन काहीतरी तोडगा काढतील, असेही ते म्हणाले. 

अधिक वाचा : पणजी मनपाची च्युईंग गम विक्रीवर बंदी 

खलाश्यांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, आंदोलन करुन काहीच फायदा होणार नाही. मुख्यमंत्री हा विषय हाताळत आहेत आणि त्यांना या विषयाचे गांभिर्य आहे. सध्या सीमा बंद असल्याने समस्या निर्माण होतात. त्यामुळे सध्या समजुतदारपणे वागण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

 "