Sun, Aug 09, 2020 13:19होमपेज › Goa › इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची पणजीत निदर्शने 

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची पणजीत निदर्शने 

Last Updated: Jul 03 2020 1:22AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्य शिवसेना पदाधिकार्‍यांनी गुरूवारी वाणिज्य कर आयुक्त कार्यालयाबाहेर इंधन दरवाढी विरोधात निदर्शने केली. कार्यालयात आयुक्त उपस्थित नसल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांनी अतिरिक्त आयुक्त सरीता गाडगीळ यांची भेट घेतली. शिवसेनेकडून इंधनावरील व्हॅट कमी करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

गोवा राज्यात कोरोनाचा चौथा बळी

निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत म्हणाले, राज्यात कार किंवा दुचाकी वाहन चैनीच्या वस्तू नसून अत्यावश्यक साधन सुविधा आहेत. राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. तर अद्याप राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यात सर्व सरकारे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.  

हॉटेल्स आजपासून सुरू करण्यास परवानगी 

इंधनावरील व्हॅट कमी करून कमी पैशात लोकांना इंधन उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. डिलर यांना १८ ते १९ रूपये दरात इंधन उपलब्ध होते. असे असताना नागरीकांना ७०% उत्पादन शुल्क आणि २५ टक्के  व्हॅट मिळून ७७ ते ८० रूपये प्रति लिटर दराने इंधन विकणे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, असा प्रकार असल्याचीही टीका कामत यांनी केली.