Wed, Aug 12, 2020 01:03होमपेज › Goa › गोवा : लॉकडाऊन घोषणा होताच भाज्यांचे दर गगनाला

गोवा : लॉकडाऊन घोषणा होताच भाज्यांचे दर गगनाला

Last Updated: Jul 17 2020 1:41AM

पणजी मार्केटपणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्या शुक्रवार (दि.१७ रोजी) पासून तीन दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर पणजी मार्केट तसेच सुपरमार्केट व दुकानांमध्ये भाज्यांचे दर आव्वाचे सव्वा झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. 

गोव्यात लॉकडाऊन : उद्यापासून ३ दिवस

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गुरुवारी लोकांनी पणजी मार्केट तसेच सुपरमार्केट व दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळपासून एकच गर्दी केली. या संधीचा फायदा घेऊन काही भाजी विक्रेत्यांनी पणजी मार्केटमध्ये भाज्यांचे दर वाढवले. एरवी २० रुपये किलो दराने मिळणारा कांदा ३० रुपये किलो, ३० रुपये किलो मिळणारा टोमॅटो ४० ते ६० रुपये तर बटाटा ४० रुपये किलो अशा चढ्या दराने विकला जात आहे. मात्र या सगळ्या गोष्टी महाग झाल्या असल्या तरी लोक भाजी तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू मोठया संख्येने खरेदी करताना दिसत आहेत. 

आमोणकरांच्या मृत्यूच्या कारणाविषयी संभ्रम : मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने १७, १८ आणि १९ जुलै असे तीन दिवस लॉकडाऊन घोषित केले आहे. तर १० ऑगस्ट पर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ दरम्यान र्क्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तीन दिवसांचे लॉकडाऊन १५ दिवसांपर्यंत वाढू शकते, अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे लोकांनी पणजी बाजारात तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. सकाळपासून लोकांनी या दुकानांच्या बाहेर भर पावसात रांगा लावल्या होत्या. लोकांनी विनाकारण घाबरुन जावू नये असे सरकारकडून आवाहन केले असताना देखील लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती.