पणजी : प्रतिनिधी
गोवा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या कथित पोर्तुगीज नागरिकत्व प्रकरणी उद्या पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी या प्रकरणात उत्तर गोवा पोलिस अधीक्षक व पणजी पोलिस निरीक्षकांना नोटीस बजावून त्यांना उत्तर देण्यास सांगितले होते.
उपसभापती फर्नांडिस हे पोर्तुगीज नागरिक असून त्यांच्या विरोधात पणजी पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करुन आरटीआय कार्यकर्ते आयरीश रॉड्रिग्स यांनी 13 ऑगस्ट रोजी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
फर्नांडिस यांच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात 4 ऑगस्ट रोजी तक्रार देण्यात आली. मात्र त्यावर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने अॅड. फर्नांडिस यांनी न्यायालयात याचिका दाखल करुन कारवाईची मागणी केली.