Sun, Sep 20, 2020 10:37होमपेज › Goa › गोवा राज्‍य मंत्रीमंडळाची बैठक अचानक रद्द

गोवा राज्‍य मंत्रीमंडळाची बैठक अचानक रद्द

Published On: Mar 08 2019 12:58PM | Last Updated: Mar 08 2019 12:58PM
पणजी :  प्रतिनिधी

गोवा राज्य मंत्रीमंडळाची आज दुपारी 12 वाजता होणारी  बैठक रद्द करण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठक का रद्द करण्यात आली याचे कारण मात्र देण्यात आलेले नाही.  

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या खासगी निवासस्थानी शुक्रवार (दि.8) मार्च रोजी  मंत्रिमंडळाची  बैठक  बोलावण्यात आली होती. या बैठकीत प्रस्तावित चिंबल भागात स्वतंत्र ‘आयटी पार्क’ म्हणून अधिसूचित करण्यास मान्यता मिळण्याची शक्यता होती.

चिंबलच्या आयटी पार्कची जागा अधिसूचित झाल्यास स्थानिक पंचायत  संस्थेच्या कक्षेतून संबंधित क्षेत्र वगळले जाऊ शकते. गेली दोन वर्षे हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी अजूनही निर्णायक टप्प्यावर तो आलेला नसल्याने सदर भाग अधिसूचित करण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. 

आगामी लोकसभा  निवडणूकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मंत्रीमंडळ बैठकीत आयटी पार्क प्रमाणेच अन्य काही महत्वाच्या  विषयांवरही  चर्चा  होणार होती.  मात्र  सदर मंत्रीमंडळ बैठक अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.