Wed, Oct 28, 2020 11:46होमपेज › Goa › पणजी : काँग्रेसकडून जिल्हा पंचायतच्या उमेदवारांची यादी जाहीर

पणजी : काँग्रेसकडून जिल्हा पंचायतच्या उमेदवारांची यादी जाहीर

Last Updated: Mar 05 2020 1:18AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बुधवारी ९ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. यात उत्तर गोव्यातील पाच व दक्षिण गोव्यातील चार जिल्हा पंचायत मतदारसंघांचा समावेश आहे. ही उमेदवारांची दुसरी यादी असून काँग्रेसने पहिल्या यादीत २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. 

अधिक वाचा :एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली.

उत्तर गोव्यातील उमेदवारांची नावे

हळदोणे  (महिला ओबीसी आरक्षित ) रुबी हळर्णकर, हणजुण (महिला आरक्षित) संगीता लिंगुडकर, खोर्ली (ओबीसी आरक्षित) विशाल वळवईकर, सेंट लॉरेन्स अँथनी लिनो फर्नांडिस व मये (महिला आरक्षित) प्रसाद चोडणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा : गोवा : रेमंड फर्नांडिस यांच्या शैक्षणिक दाखल्यांची देखील पडताळणी करा

दक्षिण गोव्यातील उमेदवारांची यादी 

गिरदोळी (महिला आरक्षित) सोनिया फर्नांडिस,  सावर्डे श्याम भंडारी, पैंगीण (महिला एसटी आरक्षित ) रेश्मा वेळीप व  कुठ्ठाळी (एसटी आरक्षित) लुपिनो झेव्हियर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी ४० जागा लावण्याचे जाहीर केले होते. मात्र आता पर्यंत केवळ 30 उमेदवारांच्याच नावांची घोषणा करण्यात आली आहे.

 "