Mon, Nov 30, 2020 13:49होमपेज › Goa › 'दहशतवादाला पाठिंबा देणार्‍यांविरोधात कठोर कारवाईची गरज'

'दहशतवादाला पाठिंबा देणार्‍यांविरोधात कठोर कारवाईची गरज'

Last Updated: Feb 25 2020 1:21AM

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूपणजी : पुढारी वृत्तसेवा

भारत शेजारी असणाऱ्या देशांबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्वाला नेहमीच प्राधान्य देतो. दहशतवाद हा संपूर्ण मानवजातीचा शत्रू असून आपल्या शेजारी देशांपैकी एक देश सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. असे पाकिस्तानचे नाव न घेता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून सुनावले आहे. तसेच जे देश दहशतवादाला पाठिंबा देतात, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी जागतिक समुदायाकडे केली आहे. ते पणजीतील कला अकादमी संकुलातील दीनानाथ मंगेशकर सभागृहात गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी नायडू म्हणाले, की शेजारील देश भारताला त्रास देण्यास धन्यता मानत असून देशाच्या अंतर्गत प्रश्नांतही नाक खुपसत आहेत. ते दहशतवादला प्रोत्साहन व फंडिंगही करत आहेत. आम्हाला प्रगती करायची असेल तर शेजारील देशाकडून आम्हाला त्रास दिलेले चालणार नाही.