Mon, Sep 21, 2020 04:30होमपेज › Goa › मडगाव :बाणशे येथील जंगलात महिलेचा खून 

मडगाव : बाणशे येथील जंगलात महिलेचा खून 

Published On: Jun 07 2019 10:48AM | Last Updated: Jun 09 2019 1:23AM
मडगाव :  प्रतिनिधी

तिमा वाडो (रिवण) येथील बाणशे येथे जंगलात निर्जनस्थळी वेलनसिया फर्नांडिस या तिशीतील महिलेचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सदर महिला मायणा कुडतरी येथील रहिवाशी आहे.

गुरुवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. महिलेच्या शरीरावर जीन्स पॅन्ट आणि जॅकेट आढळून आले आहे. गळा दाबून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सदर युवती मडगावमधील एका वैद्यकीय आस्थापनात कामाला होती.  गुरुवारपासून ती आपल्या घरी परतली नव्हती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी मायणा कुडतरी पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिस निरीक्षक रॉय परेरा, रवी देसाई , महाजीक आणि सुदेश नार्वेकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.