Fri, Aug 14, 2020 13:55होमपेज › Goa › खासदार श्रीपाद नाईक यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन

खासदार श्रीपाद नाईक यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन

Published On: May 24 2019 8:38PM | Last Updated: May 27 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

उत्तर गोवा खासदारपदी पाचव्यांदा निवडून आलेले भाजप खासदार श्रीपाद नाईक यांनी आपले कुटुंबिय तसेच कार्यकर्त्यांसोबत पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचा आर्शिवाद घेतला. यावेळी खासदार नाईक यांच्या पत्नी, पुत्र सिध्देश तसेच पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नाईक म्हणाले, सलग पाच वेळा आपण लोकसभा निवडणूक जिंकलो हा एक रेकॉर्ड आहे. विरोधकांनी सर्व प्रयत्न करुन देखील जनतेने आपल्या बाजूने कौल दिला. यासाठी जनतेचे आभार आहे. केंद्रीय निधीतून पंचायत पातळीवर तसेच राज्यात केली जाणारी विकास कामे या ही पुढे अशीच सुरुच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. तर पंतप्रधान आपल्याला जी जबाबदारी देतील ती आपण स्वीकारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नाईक यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज सादर करण्यापूर्वी देखील महालक्ष्मी मंदिरात जाऊन आर्शिवाद घेतला होता. त्यानुसार त्यांनी खासदारपदी विराजमान झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा आपल्या कुटुंबीय तसेच कार्यकर्त्यांसोबत देवीचे दर्शन घेतले. 

श्रीपाद नाईक हे 1994 सालापासून सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी आतापर्यंत केंद्रात विविध मंत्रीपदे देखील हाताळली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये ते आयुषमंत्री आहेत.