Mon, Sep 21, 2020 04:36होमपेज › Goa › पणजी : आमदार मोन्सेरात आणि आजी- माजी महापौरांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा 

पणजी : आमदार मोन्सेरात आणि आजी- माजी महापौरांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा 

Published On: Jun 01 2019 7:00PM | Last Updated: Jun 02 2019 1:41AM
पणजी : प्रतिनिधी

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, मनपा महापौर उदय मडकईकर तसेच माजी महापौर यतिन पारेख यांच्याविरूध्द विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. त्‍यापार्श्वभूमीवर मोन्सेरात, मडकईकर आणि पारेख यांनी आज (1 जून) शनिवारी पणजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बिग डॅडी कॅसिनोचे अतिक्रमण  हटवताना  बाचाबाची झाली. यावेळी आपला विनयभग झाला आहे अशी तक्रार एका महिलेने केली आहे. या प्रकरणी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, मनपा महापौर उदय मडकईकर तसेच माजी महापौर यतिन पारेख यांच्या विरोधात  पणजी पोलिसांत शुक्रवारी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ही तक्रार नोंद करुन घेतली आहे.

विनयभंगाबरोबर वरील तिन्ही संशयितांनी आपल्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप या तक्रारीत पीडित महिलेकडून करण्यात आला आहे.