Mon, Nov 30, 2020 12:36होमपेज › Goa › कोकण रेल्वे महामंडळाला 102 कोटींचा नफा

कोकण रेल्वे महामंडळाला 102 कोटींचा नफा

Last Updated: Feb 08 2020 10:54PM
पणजी ः पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे महामंडळाला 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या वर्षात  5629 कोेटींचे उत्पन्न प्राप्त झाले असून 5527 कोटी रुपये खर्च झाला आहे. एकूण उलाढालीतून कोकण रेल्वेला  102 कोटींचा निव्वळ नफा मिळाल्याची माहिती कोकण रेल्वेचे उपव्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेला महसुलाच्या स्वरुपात 2899 कोटी उत्पन्न मिळाले. प्रवासी रेल्वे गाड्यांवर 654 कोटी, मालगाडी वाहतुकीवर 515 कोटी व रेल्वेच्या इतर प्रकल्पांवर 1561 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. यापैकी रोल अँड रोलच्या वाहतूक सेवेवर सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झालेअसून रो-रोची वाहतूक सेवा क़ोकण रेल्वेलाा लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण रेल्वेने सुरू केलेल्या प्रवासी रेलगाड्यांवर यंदा 654 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले असले, तरी त्या रेल्वेच्या गाड्यांवर जास्त प्रमाणात खर्च होतो. प्रवासी रेल्वे गाड्यांवर प्रत्येकी चार तिकिट कलेक्टर, दोन चालक व एक गार्ड नियुक्त करावे लागतात. त्याशिवाय विजेचा, पाण्याचा वापर, जास्त प्रमाणात इंधनाचा पुरवठा, साफसफाईसाठी कामगार, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची नियुक्ती करावी लागते.  प्रवासी रेल्वे गाड्यांवर वार्षिक साडसहाशे कोटी रुपयाचे  उत्पन्न प्राप्त झाले असले, तरी साडेपाचशे कोटी रुपये कर्मचार्‍यांवर व देखभालीवर खर्च करावे लागतात. प्रवासी रेल्वे गाड्यांची सेवा मर्यादित असते.

मालगाडी रेल्वे व रो-रोच्या रेल्वे सेवेवर गेल्या वर्षी 515 कोटी रुपये उत्पन्न प्राप्ती मिलाले आहे. या सेवेवर कोकण रेल्वेला 85 ते 90 टक्के नफा प्राप्त झालेला आहे. मालगाडी व रो-रोच्या रेल्वे सेवेवर दोन चालक व एका गार्डाची नियुक्ती केली जाते. इंधनाचा पुरवठा करावा लागतो तेवढाच. वीज, पाणी व रेल्वे कर्मचार्‍यांचा खर्च नसतो. मात्र माल उतरविण्यासाठी रेल्वेला गोदाम लागतात. तरी गोदामात ठेवलेल्या मालावर कोकण रेल्वेला उत्पन्न प्राप्ती होते.

रो-रोच्या सेवेत गोदामाची व्यवस्था नसतो. रो-रोची रेल्वेगाडी ठरावीक रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांची रस्ता वाहतूक सुरू होते. रोहापासून मडगाव व सुरतकाल (मंगळूर) पर्यंत रो-रोची सेवा असते. रो-रोच्या सेवेवर कोकण रेल्वेला दरवर्षी अधिक उत्पन्न मिळते, असे घाटगे यांनी सांगितले.कोकण रेल्वेने रोहापासून महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या आवारात गुड्स कॅरियर, गोदाम, कार्गो सेवा, पार्सल सेवा व अन्य प्रकल्प सुरू केले आहेत. त्या विविध प्रकल्पांवर  यावर्षी 1561 कोटी रुपये उत्पन्न प्राप्ती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.