Mon, Sep 21, 2020 05:23होमपेज › Goa › कांदोळकरांना ‘मगो’चा पाठिंबा : अ‍ॅड. पंडित

कांदोळकरांना ‘मगो’चा पाठिंबा : अ‍ॅड. पंडित

Published On: Apr 07 2019 1:44AM | Last Updated: Apr 07 2019 12:40AM
म्हापसा : प्रतिनिधी

म्हापसा शहराचा गेल्या वीस वर्षांत विकास झालेला नाही. कित्येक प्रकल्प रेंगाळत पडलेले आहेत. हे प्रकल्प आणि विकासकामे पूर्ण करण्यासाठी सुधीर कांदोळकर या  काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या म्हापसा गटाने घेतला असून केंद्रीय समितीने ही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती मगोचे गटाध्यक्ष अ‍ॅड. वामन  पंडित यांनी म्हापसा मगो कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

बाळू फडके, प्रभाकर वेर्णेकर, रामदास फळारी, गीतेश डांगी, नीलेश साटेलकर उपस्थित होते. तसेच गट  समितीचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंडित म्हणाले की, म्हापशात पार्किंगची सुविधा नाही, रवींद्र भवन नाही, करमणुकीसाठी सिनेमा थिएटर नाही. कदंब बसस्थानक धूळखात पडले आहे. येत्या अडीच-तीन वर्षांत सुधीर कांदोळकर हे प्रकल्प पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.

बाळू फडके  म्हणाले की, सुधीर कांदोळकर हे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष असल्याने म्हापशाच्या समस्यांची त्यांना  जाणीव आहे. सुधीर कांदोळकर यांना दांडगा अनुभव असून दूरदृष्टी आहे. म्हापशातील इतर समस्यांसमवेत कचरा समस्याही ते नक्कीच सोडवतील. भाजपचा उमेदवार केवळ आमदारपुत्र आहे.  त्याच्याकडे कसला अनुभव नाही. लोकांत मिसळण्याची सवय नाही. परंतु सुधीर कांदोळकर हे लोकप्रिय असून लोकांना सहज उपलब्ध होऊ शकतात. म्हणून म्हापसा गटाने एकमताने निर्णय घेऊन त्यांना पाठींबा दिला आहे.

दरम्यान, संध्याकाळी खोर्ली राष्ट्रोळी मंदिराकडून मगो व काँगे्रस कार्यकर्त्यांनी संयुक्तरित्या प्रचार सुरू केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

विश्‍वास सार्थ ठरवीन : कांदोळकर

सुधीर कांदोळकर यांनी म्हापसा मगो कार्यालयात येऊन कार्यकत्यार्ंशी संवाद साधला. आपल्यावर जो विश्‍वास दाखवला आहे, तो सार्थकी लावेन. कधीही विश्वासघात करणार नाही. जे प्रकल्प अपुरे राहिले आहेत ते पूर्ण करण्यास आपण कटीबद्ध आहे,  असे सुधीर कांदोळकर यांनी सांगितले.